PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या नियमात मोठा बदल! थेट शेतकऱ्यांच्या २१व्या हप्त्यावर होणार परिणाम

PM Kisan Yojana Rule Change: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

२१वा हप्ता लवकरच दिला जाणार

पीएम किसान योजनेच्या नियमांत बदल

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २० हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

या शेतकऱ्यांना होणार फायदा

सरकारने पीएम किसान योजनेत एक नवीन तरतूद केली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे. अशा परिस्थितीत, राज्य सरकारला तो शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो, हे दाखवावे लागेल. या पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

दिवाळीपर्यंत येऊ शकतो पुढचा हप्ता

देशभरातली शेतकरी सध्या २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने संकेत दिले आहेत की, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

पैसे कोणाला मिळणार?

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता देताना काही नियमांमध्ये बदल केला जाईल. या योजनेत केंद्र सरकारने पुरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना प्रथम लाभ दिला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, पंजाबमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदा योजनेचा लाभ मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT