PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ₹२००० कधी येणार? त्याआधी हे काम करा, अन्यथा...

PM Kisan Yojana Next Installment Date: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार?

केवायसी गरजेचे

या कारणांमुळे पैसे मिळणार नाहीत

देशातील कोट्यवधी लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण २० हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता २१ वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजनेत दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक हप्त्यात २००० रुपये जमा होतात. दरम्यान, आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लागले आहे.

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana Next Installment Date)

पीएम किसान योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. मागील हप्त्याची तारीख जून महिन्यात होती. मात्र, हा हप्ता दोन महिने उशिरा म्हणजे ऑगस्ट महिन्यात आला. त्यामुळे पुढचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

केवायसी करणे गरजेचे (PM Kisan Yojana KYC)

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसान योजनेत केवायसी करा. तुम्ही ऑनलाइन किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन केवायसी करु शकतात.

या कारणांमुळे मिळणार नाही पैसे

फक्त ई केवायसी नाही तर बँक खाते, वैयक्तिक माहिती, आधार कार्ड ही माहिती देणे गरजेचे आहे. जर तुम्ही याबाबत कोणतीही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला पैसै मिळणार नाही. जर काही तांत्रिक अडचणी असेल तरीही तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT