PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? त्याआधी करा ही कामे, अन्यथा ₹२००० विसरा

PM Kisan Yojana Next Installment Date: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जून महिन्यात मिळणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.

Siddhi Hande

केंद्र सरकारने पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले आहेत. पीएम किसान योजनेत आता पुढचा हप्ता जूनमध्ये दिला जाणार आहे. या योजनेत येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. अजूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

पीएम किसान योजनेचा कोट्यवधी शेतकरी लाभ घेतात. या योजनेत वार्षिक ६००० रुपये दिले जातात. यामध्ये दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. त्यामुळे २०वा हप्ता याच महिन्यात दिला जाणार आहे.

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. हा हप्ता २० जून रोजी येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. परंतु येत्या ५-६ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

हे काम आताच करा (PM kisan Yojana KYC Update)

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात आधी तुम्ही केवायसी पूर्ण करा. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी पूर्ण करु शकतात. तसेच तुम्हाला बेनिफिशियरी स्टेट्सदेखील चेक करता येणार आहे.

जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कदाचित पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही CSC सेंटर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार करु शकतात. याचसोबत 155261 या 1800115526 या नंबरवर कॉल करुन तक्रार नोंदवू शकतात.

पीएम किसान योजना केवायसी प्रोसेस (PM Kisan Yojana KYC process)

तुम्ही पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जा.

त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर ई-केवायसीवर क्लिक करा.

आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. त्यानंतर केवायसी पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Makeup Tips: दाट आयब्रोजसाठी करा असा सोपा मेकअप, दिसेल एकदम फ्रेश नॅचरल लूक

Maharashtra Live News Update: सोलापूर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचा प्रकाशन सोहळा

ऐन निवडणुकीत ठाकरेंचा बडा नेता फुटणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी ऑफर|VIDEO

'अंडरवेअर'ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली , नेमकं काय घडलं?

Samruddhi Mahamarg Traffic Block: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर ५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक, कधी आणि कुठे?

SCROLL FOR NEXT