PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? त्यापूर्वी करा अर्ज; स्टेप बाय स्टेप प्रोसेस घ्या जाणून

PM Kisan Yojana Application Process: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही अजूनही अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना खूप प्रसिद्ध आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. आता पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांना २०वा हप्ता मिळणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, शेतकरी अजूनही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करु शकतात. या योजनेसाठी अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.

देशातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. आता मागचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात पुढचा हप्ता दिला जाणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply For PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. या आधार कार्डमध्ये तुमची सर्व माहिती खरी असायला हवी. जर तुमची चुकीची माहिती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.याचसोबत तुमच्या नावावर शेती असायला हवी. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याचसोबत तुम्हाला केवायसी करायचे आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर टाकावा.

यानंतर मोबाईल नंबर टाका.

तुमचे राज्य निवडायचे. त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल.

यानंतर तुमची सर्व माहिती अपलोड करा. आधार कार्ड आणि पासबुकमधील माहिती भरा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

अर्ज करायची ऑफलाइन पद्धत

तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला कागदपत्रे घेऊन जायची आहे. तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर फॉर्म भरुन तो सबमिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT