किसान सन्मान निधी ही केंद्रीय योजना देशभरामध्ये २०१९ पासून सुरु आहे. यामध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या योजनांपैकी एक आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. ही रक्कम शेतकऱ्यांना हप्त्यामध्ये विभागून दिली जाते. हा हप्ता वर्षातून ३ वेळा दिला जातो. या योजनेसाठी सरकारने अनेक नियमही केले आहे. परंतु, एकाच घरात वडील आणि मुलगा पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? अर्ज करत असतील तर एका घरामध्ये वर्षाला बारा हजार मिळू शकतील का? काय आहेत नियम (rules) जाणून घेऊया.
येत्या २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी जमा होणार आहे. याचे आतापर्यंत पंधरा हप्ते जमा झाले असून लवकरच सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल. यासाठी सरकारने (Goverment) शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे केले होते.
केंद्र सरकारच्या नियमानुसार एकाच घरातील दोन व्यक्तींना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे तिच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. सरकारच्या नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे त्या व्यक्तीला किसान सन्माननिधीसाठी अर्ज (Application) करु शकतात. यामध्ये वडिल आणि मुलगा वेगळे राहात असतील आणि त्याच्या स्वत:च्या नावावर वेगवेगळी जमिन असेल त्यांना हा लाभ घेऊ शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील कोणताही हप्ता हा सरकारकडे आधार डेटाबेस आहे. ज्यावरुन कुटुंबातील किती लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे कळते.
1. स्टेट्स चेक करा
जर तुम्हाला हप्त्याचा स्टेटस पाहायचा असेल तर शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ऑफिशयल वेबासाइटला भेट द्यावी लागेल.
पीएम किसान वेबसाइटवर तुम्हाला पीएम बेनफिट्सचे स्वैच्छिक आत्मसमर्पण पर्याय निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. Get OTP वर क्लिक करावा लागेल.
OTP आल्यानंतर सबमिट करुन क्लिक करा.
यानंतर तुम्हाला स्क्रिनवर माहिती मिळेल. आतापर्यंत किती हप्ता मिळाला आहे हे कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.