शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणं, हा या योजनांचा उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत १५ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
आता सरकार पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत रक्कम वाढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. शेतकऱ्यांना आता वार्षिक ८ हजार रुपये दिले जाऊ शकतात. केंद्र सरकार पीएम गरीब कल्याण अन्न योजनेतील तरतुदी वाढविण्याचा विचार करत आहे. एका अहवालात ही बाब समोर आलीय. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना वर्षभर अनेक हप्त्यांमध्ये मिळतात. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये दिले जातात.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारनंं १५ नोव्हेंबर २०२३ रोजी या योजनेचा १५ वा हप्ता जारी केला होता. ज्यामध्ये साडेआठ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. (latest marathi news)
एखादा शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याकडून भाड्याने जमीन घेवून भाडेतत्वावर शेती करत असेल, तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. पीएम किसान योजनेसाठी जमीन स्वत:च्या मालकीची असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंबातील कोणी सरकारी पदावर असेल तर त्याला त्याचा लाभ मिळत (PM Kisan Yojana Benefit) नाही. डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वास्तुविशारद आणि वकील यासारख्या व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही. यासोबतच १० हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळत नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी किसान सन्मान निधी योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकरी टोल फ्री क्रमांक १५५२६१ वर संपर्क साधू शकतात. आपलं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. खात्यात पैसे येतील की नाही? अशी सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.
आत्तापर्यंत पीएम किसान योजनेशी संबंधित माहिती इंटरनेट पोर्टलवर मिळत आहे. आता तुम्ही मोबाईल अॅपद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेऊ शकता. यासाठी शेतकरी त्यांच्या मोबाईलवर पीएम किसान मोबाईल अॅप (PM Kisan Mobile App) डाउनलोड करू शकतात. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते थेट गुगलच्या प्ले स्टोअरवर जाऊन पीएम किसान अॅप डाउनलोड करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.