maharashtra pm kisan yojana 24th installment news  AI Image
बिझनेस

PM Kisan Yojana : ...तर PM किसान योजनेचा २४ वा हप्ता येणार नाही खात्यात; आजचं करा 'ही' महत्त्वाची ४ कामे

Government PM Kisan Yojana 24th Installment Update News : PM Kisan 24व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट. अपूर्ण माहिती, मोबाईल नंबर अपडेट, ऑनलाइन रिफंड आणि अधिकाऱ्यांशी संपर्कासाठी नव्या सुविधांची माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • PM Kisan 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये हप्ता मिळण्याची शक्यता

  • पीएम किसानच्या पोर्टलवर काही महत्त्वाच्या अपडेट्स

  • आजच तुमची माहिती अपडेट्स न केल्यास हप्ता थकण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) २४व्या हप्त्याची कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी पीएम किसानच्या पोर्टलवर काही महत्त्वाच्या अपडेट्स आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेशी संबंधित अनेक कामे घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. हप्ता येण्यापूर्वी ही कामे न केल्यास तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. काय आहेत नवीन सुविधा ?जाणून घ्या

माहिती ऑनलाइन अपडेट करता येणार

पीएम किसानच्या नोंदणीमध्ये काही माहिती अपूर्ण असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आता कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. पोर्टलवरील ‘Update Missing Information’ या पर्यायाच्या माध्यमातून शेतकरी आपली माहिती ऑनलाइन पूर्ण करू शकतात. यासाठी आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा भरून रेकॉर्ड शोधावा लागेल. त्यानंतर अपूर्ण माहिती भरून ऑनलाइन सबमिट करता येईल.

मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा

मोबाईल नंबर बदलला असेल किंवा आधार कार्डशी नवीन नंबर लिंक केला असेल, तर पीएम किसानच्या रेकॉर्डमध्येही तो अपडेट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी ‘Update Mobile Number’ हा पर्याय उपलब्ध आहे. आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीन मोबाईल नंबर अपडेट करता येतो.

पैसे परत करण्याची सुविधा

एखादा लाभार्थी पीएम किसान योजनेसाठी पात्र नसतानाही त्याच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत असेल, तर पोर्टलवर ‘Online Refund’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरल्यानंतर OTPच्या माध्यमातून रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क करता येणार

पीएम किसानशी संबंधित अडचण दूर होत नसल्यास शेतकरी संबंधित अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात. यासाठी पोर्टलवर ‘Search your Point of Contact (POC)’ पर्याय देण्यात आला आहे. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी ‘State Nodal Contact Detail’, तर जिल्हास्तरीय समस्यांसाठी ‘Search District Nodal’ पर्यायाचा वापर करता येईल. राज्य आणि जिल्हा निवडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचे नाव, फोन नंबर आणि ई-मेलची माहिती मिळू शकते. त्यामुळे पीएम किसानचा 24वा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीतील माहिती, मोबाईल नंबर आणि इतर तपशील तपासून आवश्यक ते अपडेट करून ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण माहिती अपूर्ण असल्यास शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात दुष्काळाची भयंकर परिस्थिती; दिवाळीपूर्वी मदतीची शेतकऱ्यांची मागणी, बावनकुळेंचा मोठा दावा

Navratri: शारदीय नवरात्रीमध्ये केस अन् नखं का कापू नये?

Fennel Seeds Water Benefits: त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर बडीशेपचे पाणी, असा करा सोपा पद्धतीने वापर

नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवरच मारली उडी! पत्नीसोबत पुढे काय झालं? व्हिडिओ व्हायरल

भाजपला मोठा धक्का, उमेदवारी नाकारल्याने गडकरींचे खंदे समर्थक बंडाच्या तयारीत, पदवीधरमध्ये मोठा भूकंप

SCROLL FOR NEXT