PM Kisan Yojana meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'ही' 3 महत्त्वाची कामे आजच करा; अन्यथा, पीएम किसानचा 24 वा हप्ता विसरा

PM Kisan Yojana 24th Installment: पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी e-KYC, Land Verification आणि बँक खातं काही महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावीत अन्यथा हप्ता अडकू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार अनेक योजना राबवत असतं. त्यातील सर्वात प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना. यामध्ये पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला ६००० रुपये जमा होतात. हा निधी ३ हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवला जातो. आता शेतकरी २४ वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. पण हा हप्ता वेळेत मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रोसेस पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.

पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्वात आधी ई - केवायसी (e-KYC) पूर्ण करणं गरजेचं आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांची ओळख निश्चित होते आणि योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण केली पाहिजे.

तसेच Land Verification करणंही अनिवार्य आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या शेतीयोग्य जमिनीची पडताळणी केली जाते. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची मानली जाते. तसेच शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक केला आहे की नाही, याची खात्री करून घ्या. नसेल तर हप्त्याची रक्कम खात्यात जमा होताना अडचणी येऊ शकतात.

पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता हा चार महिन्यांच्या अंतराने खात्यात पाठवला जातो. त्यानुसार २४ व्या हप्त्याचा कालावधी ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होत असल्याने, याच महिन्यात हप्ता जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण याबद्दल केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी, Land Verification आणि आधार-बँक खातं लिंकिंग ही तीनही कामं पूर्ण करून ठेवली पाहिजेत. कारण या प्रोसेस अपूर्ण राहिल्यावर २४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि पात्र असूनही आर्थिक मदतीपासून वंचिक राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT