PM Kisan 24th installment  meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्ता लवकरच जमा होणार अशी माहिती समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत आहे. सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची वाट देशातले कोट्यवधी शेतकरी पाहतायेत. या हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण २० ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे आणि मागच्या हप्त्यानंतर चार महिने पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांकडे पुढचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जातात.

२० ऑक्टोबरला मिळणार का २४ वा हप्ता?

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले गेले आहे. आता २४ व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आङे. साधारणपणे केंद्र सरकार या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी जारी करतं. त्यामुळे मागच्या हप्त्यानंतर चार महिने पूर्ण होत असल्याने २० ऑक्टोबरच्या तारखेबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, २० ऑक्टोबरलाच पैसे जमा होतील, असं निश्चितपणे सांगता येणार नाही. केंद्र सरकारने अद्याप हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणं आवश्यक आहे.

दसऱ्यानंतर दिवाळीआधी पैसे मिळण्याची शक्यता?

२० ऑक्टोबरला दसऱ्याचा सण असल्याने बँकांच्या सु्ट्ट्यांचाही विचार केला जातो. त्यामुळे त्या दिवशीच हप्ता जारी होईल का, याबद्दल अनिश्चितता आहे. दसऱ्यानंतर आणि दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ही फक्त शक्यता असून अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

मागच्या हप्त्यांच्या तारखांवरून काय संकेत मिळतात?

दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मधल्या वर्षाच्या अखेरचा हप्ता १९ नोव्हेंबरला जारी करण्यात आला होता. तर २०२६ मधल्या मागच्या हप्ता २० जूनला जमा झाल्याचे नमूद आहे. या तारखांमधले अंतर लक्षात घेता ऑक्टोबरमध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता चर्चेत आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी हप्त्याबाबतची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच आपली ई-केवायसी प्रोसेस, बँक खातं आणि लाभार्थी स्थिती तपासून ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

Maharashtra Government: फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT