PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ही ४ कामे आताच करा, अन्यथा ₹२००० विसरा

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना २२वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२२वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा

केवायसी करणे अनिवार्य

देशातील जवळपास ९ कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांना काही कामे करणे अनिवार्य आहेत.जर त्यांनी ती कामे केली नाही तर त्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही.

ही कामे आजच करा

केवायसी करणे अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करायचे आहे.

तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसणार आहे.

यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

यानंतर ओटीपी टाकून केवायसी पूर्ण करायची आहे.

जमिनीचे व्हेरिफिकेशन

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची योग्य आणि खरी माहिती द्यायची आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे व्हेरिफेकेशन केले जाणार आहे.

जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

आधार बँक लिंक (Aadhaar-Bank Link)

शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करायचे आहे.

जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

तुम्ही बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन आधार बँक अकाउंट लिंक करायचे आहे.

फार्मर आयडी गरजेचे (Farmer ID)

पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे आहे.

काही राज्यातील शेतकऱ्यांना हे कार्ड अनिवार्य केले आहे.

फार्मर आयडी काढण्याची प्रोसेस ऑनलाइन आहे. शेतकऱ्यांनी हे कार्ड काढायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT