PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच २१वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही ते जाणून घ्या.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?

तुम्हाला पैसे येणार की नाही?

अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारद्वारे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. प्रत्येक ४ महिन्यांनी २००० रुपये जमा केले जातात. दरम्यान, आतापर्यंत शेतकऱ्यांना २० हप्ते देण्यात आले आहेत.त्यानंतर आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला घरबसल्या हप्ता जमा झाला की नाही हे चेक करु शकतात.

कधी येणार हप्ता? (PM Kisan Yojana 21st Installment Date)

पीएम किसान योजनेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात, असं सांगितलं होतं. ६ नोव्हेंबर रोजी बिहारची विधानसभा निवडणूक आहे. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, उद्या बिहारच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अजूनपर्यंत हप्त्याची घोषणादेखील झालेली नाही. त्यामुळे यावेळी हप्ता अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

तुम्हाला पैसे येणार की नाही?

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले तरच तुमच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर किंवा CSC केंद्रात जाऊन केवायसी करायची आहे.

स्टेट्‍स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status Check)

सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in वर जायचे आहे. यानंतर तुम्हाला तिथे Know Your Status असा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर Get Data वर क्लिक करा.यानंतर तुम्हाला स्टेट्‍स दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT