PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा; ₹२००० आले की नाही?

PM Kisan Yojana 21st Installment: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना मिळाला अॅडव्हान्समध्ये हप्ता

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले आहेत. आजपासून हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. दरम्यान, आता जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना २१वा हप्ता जारी केला आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात (PM Kisan Yojana 21st Installment Recieve)

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जारी केला आहे. ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. यासाठी १७१ कोटींचा निधी जारी केला आहे.

पीएम किसान योजनेत वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. यातील २०वा हप्ता ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आला. त्यानंतर आता २१वा हप्ता जमा करण्याचीही प्रोसेस सुरु करण्यात आली.

जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना अॅडव्हान्समध्ये हप्ता (Jammu Kashmir Farmers get PM Kisan 21st Installment)

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांन २१वा हप्ता अॅडव्हान्समध्ये देण्यात आला आहे. आजपासून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहेत. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही राज्यांमधील शेतकऱ्यांना आधीच हा हप्ता देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर या राज्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे दिले जातील.

पैसे आले की नाही असं करा चेक (PM Kisan Yojana Installment Recieve or not)

पीएम किसान योजनेत पैसे आले की हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळवू शकतात. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की तुम्हाला मेसेज येईल. यावरुन तुम्हाला पैसे आले की नाही हे समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT