saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: ५ दिवस झाले, अजूनही पीएम किसानचा हप्ता आला नाही? अशी करा तक्रार, लगेच येतील ₹२०००

PM Kisan Yojana News: पीएम तिसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामागे अनेक कारणे असू शकतात.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत?

ही असू शकतात कारणे

पीएम किसानचा स्टेट्स कसा चेक करायचा?

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात आले आहेत. ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले आहे. दरम्यान, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला पैसे का आले नाहीत त्याबाबत माहिती जाणून घ्या.

या कारणांमुळे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत २००० रुपये (Why Farmers did not Recieve PM Kisan Yojana Installment)

१ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन मिळालेले शेतकरी

एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असेल तर त्यापेक्षा फक्त एका व्यक्तीला २००० रुपये मिळणार आहेत.

पडताळणी पूर्ण होईपर्यंत काही शेतकऱ्यांचे पैसे थांबवले

शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण नसेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

जर काही माहितींमध्ये तफावत असेल तर अशा शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

पीएम किसान योजनेचा सटेट्स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status)

पीएम किसान योजनेचा स्टेट्‍स चेक करण्यासाठी सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर फार्मर्स कॉनरवर क्लिक करा.

यानंतर स्टेट्‍स चेक करा यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती टाकायची आहे. यानंतर तुम्हाला स्टेट्‍स कळणार आहे.

ज्यांना हप्ता मिळाला नाही त्याबाबत सरकारचे म्हणणे काय?

ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत आणि त्यांना लाभ मिळालेला नाही. यामागे तांत्रिक अडचणी कारण असू शकतात. त्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

हप्ता मिळाला नसेल तर अशा पद्धतीने करा तक्रार

जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबरवर जाऊन तक्रार करु शकतात. याचसोबत तुम्ही ई मेलदेखील पाठवू शकतात. तुम्ही १५५२६१ आणि ०११-२४३००६०६ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकतात. pmkisan-ict@gov.in वर मेल करुन तक्रार करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: सरकार देणार 1 तोळा सोनं? मोफत सोनं देण्याची सरकारची योजना? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mahayuti Clash:अजितदादा सावरकरवादी होणार? विचारसरणीवरून महायुतीत वादावादी?

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

पुणे आणि पिंपरीचा 'दादा' कोण? महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, VIDEO

BMC Election: बंडखोरांमुळे वरळी आदित्य ठाकरेंकडून जाणार? बालेकिल्ल्यात ठाकरेंची डोकेदुखी वाढली

SCROLL FOR NEXT