PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; समोर आली अपडेट

PM Kisan Yojana 21st Installment Date : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे दिले जाणार आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

बिहार निवडणूकांपूर्वी पैसे येण्याची शक्यता

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत शेतकरी २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. दरम्यान, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिवाळीत खात्यात पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे.

या दिवशी होऊ शकते घोषणा (PM Kisan Yojana Installment Come on These Date)

मिडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करु शकतात. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीआधी याबाबत घोषणा होऊ शकते. बिहार निवडणूकीच्या तारीख समोर आली आहे. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आचारसंहिता सुरु असताना योजनेचा हप्ता मिळणार का?

बिहारमध्ये आचारसंहिता लागू आहे.त्यामुळे या काळात पीएम किसान योजनेत हप्ता मिळणार का नाही असा प्रश्न विचारला जात आहे. आचारसंहितेदरम्यान, नवीन योजना जाहीर करता येत नाही. मात्र, पूर्वी मंजूर केलेल्या योजनांसाठी पैसे देऊ शकतात, असं तज्ज्ञांचे मत आहे.

या राज्यांमध्ये आधीच दिले पैसे

केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये २१वा हप्ता आधीच जमा केला आहे. देशात अनेक ठिकाणी यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरग्रस्त गावांमध्ये आधीच पैसे वितरीत करण्यात आले. २६ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना हप्ता जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्येही शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. दरम्यान, लवकरच इतर राज्यातील शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT