PM Kisan Samman Nidhi Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ‌₹२००० मिळाले नाहीत? अशी करा तक्रार, लगेच येतील पैसे

PM Kisan Yojana 21st Installment not Recive: शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर त्यामागे काही कारणे असू शकतात.

Siddhi Hande

पीएम किसानचे हप्ता जमा होण्यास सुरुवात

तुम्हाला २००० रुपये मिळाले का?

पैसे मिळाले नसतील तर अशी करा तक्रार

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. यामध्ये ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

पीएम किसान योजनेत पैसे आले की नाही? (PM Kisan Yojana 21st Installment recieve or not)

पीएम किसान योजनेत जवळपास ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये ट्रान्सफर केले जाणार होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. लाभार्थ्यांच्या यादीत नाव असूनही पैसे जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, तुम्ही यासाठी तक्रार करु शकतात.

लाभार्थ्यांच्या यादीत नाव असूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर जाऊन तक्रार करु शकतात. याचसोबत हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 याव कॉल करुन माहिती मिळवू शकतात. तुम्ही 23381092 या टोल फ्रि नंबरवर जाऊनदेखील संपर्क करु शकतात.

लाभार्थ्यांची यादी कशी चेक करायची? (How To Check PM Kisan Yojana Status Check)

पीएम किसानच्या योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही यादी चेक करु शकतात. तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जायचे आहे. यानंतर फार्मर्स कॉनर्रवर क्लिक करा. यानंतर बेनिफिशियरी स्टेट्‍सवर क्लिक करा.यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि रजिस्टेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसणार आहे.

खात्यात पैसे न येण्याची कारणे

जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. याचसोबत तुमच्या बँक अकाउंटबाबत चुकीची माहिती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. बँक अकाउंट ईकेवायसी आणि आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. याचसोबत फॉर्म भरताना चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

Asambhav: नव्या नात्यातील दरवळ बहरणार; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रेक्षकांच्या समोर

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

Weight Loss: वजन घटवण्यात सेमाग्लुटाइडचा नवा वैज्ञानिक फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर

Shocking : मुंबई पुन्हा हादरली! सराफाची दुकानात घुसून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT