PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: कामाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येण्याची शक्यता

PM Kisan Yojana 20th Installment: पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. १८ जुलै रोजी हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.पीएम किसान योजनेच्या २०वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. हा हप्ता जून महिन्यातच यायला हवा होता. परंतु हा हप्ता लांबणीवर गेला आहे. दरम्यान, लवकरच हा हप्ता येण्याची शक्यता आहे. s

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु जुलै महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे. १८ जुलै रोजी हा हप्ता येण्याची शक्यता आहे. बिहारमधील मोतिहारी येथे पीएम नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा करु शकतात.

१८ जुलैला २०वा हप्ता मिळण्याची शक्यता (PM Kisan Yojana 20th Installment May Come On These Date)

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै रोजी पीएम किसानच्या हप्त्याची घोषणा करु शकतात. या दिवशी पंतप्रधान मोदी ७,१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन करतील, यामध्ये रस्ते, वाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी यासंबंधित योजनांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात पीएम किसानचा हप्ता वितरत करण्याची घोषणा करु शकतात.

पीएम किसान योजनेचे हप्ते कधी येतात?

पीएम किसान योजनेचा एप्रिल ते जुलै महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षी १७वा हप्ता १८ जून रोजी देण्यात आला होता. परंतु आता जुलै महिना होईन गेला तरीही पैसे खात्यात जमा झाले नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

पीएम किसान योजनेसाठी हे काम करा (Do KYC Before PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई केवायसी केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी पूर्ण करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT