देशभरातली लाखो शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहे. हा हप्ता खरंतर जून महिन्यात यायला हवा होता. मात्र, अजूनही या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा हप्ता अजून का आला नाही याबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पीएम किसान योजनेत दरवर्षी एकूण ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत आतापर्यंत १९ हप्ते देण्यात आले आहेत. शेतकरी सध्या २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मागील हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आला होता. आता जून महिन्यात मिळणारा हप्ता का लांबणीवर गेला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
कधी येणार २०वा हप्ता? (When Will PM Kisan 20th Installment Recieved)
मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा २०व्या हप्त्याची घोषणा पुढच्या आठवड्यात होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात येतील तेव्हा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे. तुमचंही लिस्टमध्ये नाव आहे की नाही चेक करा.
लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का?
सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर तुम्हाला Farmer Corner हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिककरा. यानंतर Beneficiary list वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा अशी माहिती भरायची आहे. याचसोबत गावाचीदेखील माहिती द्यायची आहे.
यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.
स्टेट्स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status)
पीएम किसानच्या वेबसाइटवर जाऊन फार्मर्स कॉनर्रवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमचा आधार नंबर, रजिस्टर मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.