PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? तारीख आली समोर

PM Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना २०वा हप्ता कधी मिळणार? याबाबत माहिती समोर आली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी योजना राबवल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्माम योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. दरम्यान, २४ फेब्रुवारीला २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आता पुढता हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

२४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता २०वा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात पैसे ट्रान्सफर केले होते. जवळपास ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यातील २.४१ कोटी या महिला आहेत. यानंतर आता जून महिन्यात शेतकऱ्यांना २०वा हप्ता दिला जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत वर्षाला ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. दर ४ महिन्याला हे पैसे दिले जातात. आता फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले आहेत. त्यानंतर चार महिन्यांनी जून महिन्यात पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा हप्त ऑक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्ही दरवेळी केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT