Pune News
Pune NewsSaam

Pune News: नशा करण्यासाठी आईचा पैसे देण्यास नकार, पोरानं १३ दुचाकी पेटवल्या, आई म्हणते माझ्या मुलाला...

Drug addict burns bikes Pune: पिंपरी चिंचवडमध्ये आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका २७ वर्षीय तरूणानं सोसायटीतील रहिवाशांच्या १३ दुचाकी पेटवून दिल्या आहेत.
Published on

गौरव अहुजा या माथेफिरू तरूणानं नशेत केलेलं अश्लील कृत्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरूणाच्या कृत्यामुळे पुणेकर संतापले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका २७ वर्षीय तरूणानं सोसायटीतील रहिवाशांच्या १३ दुचाकी पेटवून दिल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवडमधील मोरया क्षितिज बिल्डिंगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. माथेफिरू नशेखोर स्वप्नील सांगवीनं सोसायटीतील १३ दुचाकी पेटवून दिल्या. आई नशा करण्यासाठी पैसे देत नसल्यामुळे त्यानं हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं.

Pune News
Shocking Crime: तृतीयपंथीयांचं गुरू होण्यासाठी गुप्तांग कापलं, किन्नर प्रमुखाला धाडायचं होतं जेलमध्ये पण..

यासंदर्भात त्याच्या आईनं पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. 'माझा मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र, तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यानं हे कृत्य केलंय. पैसे नाही दिले तर, तो कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतो.

Pune News
Shocking News: कारण क्षुल्लक, नवरा बायकोमधला वाद टोकाला; आधी खूप झोडलं, नंतर बायकोला दगडानं ठेचलं

त्याच्यामुळे माझा नवरा गेलाय, माझं घरदार गेलं आहे. पोलिसांना मी विनंती करते, माझ्या मुलाला प्लीज सोडू नका. आज त्यानं सोसायटीतील दुचाकी पेटवल्या आहेत. उद्या तो सोसायटी देखील पेटवू शकतो. तो दुसऱ्यांना देखील धमकी देतो. पोलिसांनी कृपया माझ्या मुलाला सोडू नका', असं आरोपीच्या आईनं पोलिसांकडे विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com