केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी ही खास योजना आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेत नागरिकांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लवकरच १९वा हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला गेला होता. सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत २०,००० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता लवकरच पुढचा हप्ता देण्यात येणार आहे. (PM Kisan Yojana)
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी २,००० रुपयांची मदत केली जाते. ही रक्कम एप्रिल-जुलै, ऑगस्ट नोव्हेंबर, डिसेंबर मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळे आता या योजनेचा १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अकाउंटला फेब्रुवारी महिन्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत १६ वा हप्ता फेब्रुवारी २०२४ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर १७ वा हप्ता जूनमध्ये देण्यात आला होता आणि १८वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला होता.याच क्रमाने आता पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल. (PM Kisan Sanman Nidhi 19th Installment)
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर केवायसी केले नाही तर पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन केवायसी करावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.