PM Kisan Sanman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १६वा हफ्ता कधी येणार आणि कुणाला मिळणार नाही?

PM Kisan Sanman Nidhi Yojana Installment: देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.
Government Scheme For Farmer
Government Scheme For FarmerSaam Tv
Published On

PM Kisan Sanman Nidhi Yojana 16th Installment:

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.

शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हपत्यात २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. आतापर्यंत एकूण १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी आता १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो. (latest News)

रिपोर्टनुसार, केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यात किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जारी होऊ शकतो. या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर कधी ट्रान्सफर केली जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Government Scheme For Farmer
Petrol Diesel Rate (5th Feb 2024): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती?

सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेचा अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. याबाबत सरकार अत्यंत कडक कारवाई करत आहे. त्यासाठीच भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले आहे, त्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा १६वा हप्ता मिळणा आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारा १६ वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात देण्यात येणार आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Government Scheme For Farmer
Gold Silver Rate (5th February 2024): आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, चांदीची चकाकी उतरली; मुंबई-पुण्यातील आजचा दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com