Government Scheme For Farmer Saam Tv
बिझनेस

PM Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; जाणून घ्या

PM Samman Nidhi Yojana: सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. सरकार शेकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना राबवली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Samman Nidhi Yojana Scheme 16th Installment:

सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. सरकार शेकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेचा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत हप्ता दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना १५ हप्ता दिला आहे. त्यानंतर आता शेतकरी १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. या महिन्याच्या अखेरीस हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असे सांगितले जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Latest News)

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. वर्षाला तीन हप्ते दिले जातात. दर चार महिन्यांचा शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे दिले जातात.

सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेचा अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. याबाबत सरकार अत्यंत कडक कारवाई करत आहे. त्यासाठीच भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले आहे, त्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा १६वा हप्ता मिळणार आहे.

या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनाचा लाभ मिळणार नाही

एखाद्या शेतकऱ्याने जर दुसऱ्या शेतकऱ्याकडून भाड्याने जमीन घेऊन शेती केली तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेत लाभ घेण्यासाठी जमीन स्वतः च्या मालकीची असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आयकर कर भरणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT