सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक योजना राबवत असतं. त्यातच पीएम किसान योजना ही सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ७ हजार रुपयांनी मदत केली जाते. आता पुढील हप्ता कधी येणार? ऑक्टोबर की नोव्हेंबर यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने खात्यात पाठवला जातो. याआधीचा २३ वा हप्ता जून महिन्यात जारी करण्यात आला होता. यामुळे चार महिन्याचं अंतर लक्षात घेता २४ वा हप्ता ऑक्टोबर २०२६ मध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
मात्र, २४वा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला जारी होईल, याबद्दल केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.
२४ व्या हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या प्रोसेसे पूर्ण करणं गरजेचं आहे.
१. ईकेवायसी (e-KYC) पूर्ण असणे गरजेचे आहे.
२. शेतजमिनीचे भू- सत्यापन (Land Verification) झालेले असावे.
३. लाभार्थ्याच्या आधाक क्रमांकाचे आधार लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे.
यापैकी महत्त्वाच्या प्रोसेस अपूर्ण राहिल्या तर हप्त्याची रक्कम अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि योजनेतल्या लाभार्थी स्टेटस वेळेत तपासून घ्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.