saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? नवी अपडेट आली समोर

PM Kisan 21st Installment: पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. हा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केले नाही, त्यांना पेमेंट मिळणार नाहीये.

Bharat Jadhav

  • EKYC न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीये.

  • ११ कोटींपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत

  • २०१९ पासून आजपर्यंत २० हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील सरकारची सर्वात मोठी लोकप्रिय योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना. गेल्या पाच वर्षांपासून ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. या योजनेतून देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या २१ वा हप्त्याबाबत एक नवी अपडेट समोर आलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएम-किसानचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑलनाईन पद्धतीने जमा करणार आहेत. या योजनेचा फायदा ११ कोटीहुन अधिक शेतकऱ्यांना झालाय. या योजनेचे २० हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आले असून यातून ३.७० कोटींचे वाटप करण्यात आलेत.

आता २४ फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू करण्यात आलीय. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेबाबत २१ व्या हप्त्याविषयीची सुचना देण्यात आलीय. दोन दिवसानंतर १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा होणार आहे. पण सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नसेन त्यांच्या बँक खात्यात पैसे येणार नाही.

ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केली नाहीये. अथवा अर्धवट ठेवली आहे

बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे.

बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे.

शेतकऱ्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे

आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर चाकणमध्ये वाहतूककोंडी

Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

Jalna Politics: वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती; बुलढाण्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जालन्यात टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT