स्वतः चे हक्काचे घर असावे,अशी प्रत्येकाची इच्छा असते.घर खरेदी करायचे म्हणजे मोठा खर्च असतो. परंतु घर खरेदीसाठी सरकार तुम्हाला मदत करते. पीएम आवास योजनेत तुम्हाला घर खरेदीसाठी सब्सिडी मिळते.
प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पीएम आवास योजना सुरु केली आहे. या योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घर खरेदी करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत पाच वर्षात १ कोटीपेक्षा जास्त घरे बनवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मदत केली जाते.
पीएम आवास योजना (PM Awas Yojana)
पीएम आवास योजनेत केंद्र सरकार २.३० लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.पहिल्या फेजमध्ये १.१८ कोटी घरे बनवण्याचे टार्गेट सरकारने ठेवले होते. त्यातील ८५.५ लाख घरे बनवून ती लाभार्थ्यांना दिली आहेत.
पीएम आवास योजनेचे फायदे (PM Awas Yojana 2.0 Benefits)
पीएम आवास योजना २.० अंतर्गत १ लाख नवीन घरे तयार करण्यात येणार आहे. यात प्रत्येक घरासाठी २.३० लाखांची सब्सिडी दिली जाणारर आहे, तसेच बेनिफिशियरी-लेड कन्स्ट्रक्शन, अफॉर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप, अफॉर्डेबल रेंटल हाउसिंग आणि इंटरेस्ट सब्सिडी स्कीमदेखील दिली जाणार आहे.
या योजनेत अर्ज कसा करायचा? (PM Awas Yojana Application Process)
सर्वप्रथम तुम्ही pmay-urban.gov.in या वेबसाइटवर जा.
यानंतर होमपेजवरील Apply For PMAY-U 2.0 वर क्लिक करा. यानंतर सर्व माहिती वाचा.
यानंतर वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती भरा. त्यानंतर वेरिफिकेशन करा.
आधार कार्डची माहिती वेरिफाय करा. त्यानंतर पत्ता, उत्पन्नाचा दाखला ही माहिती भरा. फॉर्म सबमिट करण्याआधी एकदा नीट वाचा.
या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक अकाउंट, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, घराच्या मालकाचे कागदपत्रं ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.