PM Awas Yojana Saam TV
बिझनेस

PM Awas Yojana : 'या' ३ चुका कधीच करु नका, अन्यथा सब्सिडीचे पैसे करावे लागतील परत

PM Awas Yojana Rule: पीएम आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी सब्सिडी दिली जाते. पीएम आवास योजनेत जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला पैसे परत करावे लागणार आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना राबवली आहे. पीएम आवास योजनेत घर खरेदी करण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी सब्सिडी मिळते. त्यामुळे घर खरेदी करणे हे सोपे झाले आहे. परंतु पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही नियमांचे पालन करावे लागेल. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे सर्व पैसे परत घेतले जाणार आहे.

पीएम आवास योजना १.० च्या यशानंतर ९ ऑगस्ट रोजी PMAY 2.0 योजना लाँच केली. ही एक क्रेडिट लिंक सब्सिडी स्कीम (CLSS)आहे.या योजनेत सरकार घर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांचे पालन केलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. अन्यथा त्यांच्या सब्सिडीचे पैसे परत घेतले जातील.गृहकर्जाच्या सुरुवातीला सब्सिडी कर्जाच्या थकीत रक्कमेमध्ये जोडली जाईल. त्यामुळे कर्जाचा ईएमआय वाढेल. गृहकर्जाच्या कालावधीसाठी तुम्हाला हा ईएमआय भरावा लागेल. (PM Awas Yojana Rule)

या तीन चुकांमुळे पैसे परत घेतले जाऊ शकतात

कर्ज

कर्ज परतफेडीत जर कोणतीही चूक झाल्यास किंवा कर्ज एनपीए झाल्यास सबसिडी काढून घेतली जाऊ शकते.

घराचे बांधकाम थांबवणे

जर काही कारणांनी घराचे बांधकाम थांबले किंवा घराचे बांधकाम पूर्ण करता आले नाही तर सब्सिडीचे पैसे नोडल एजन्सीला परत करावे लागतील. जर तुम्हाला घर बांधण्यापूर्वीच पैसे दिले असतील तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील.

घराचा वापर न करणे

बँकेने गृहकर्जाचा पहिला हप्ता जारी केल्यापासून ३६ महिन्यांच्या आता घराचा वापर न केल्यास बँकेला सब्सिडीचे पैसे परत करावे लागतील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन केंद्रिय नोडल एजन्सी अनुदानाची रक्कम बँकांना पाठवतात. यात राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, नागरी विकास महामंडळ, स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

पीएम आवास योजनेअंतर्गत, अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यात जमा केले जाते. त्यामुळे गृहकर्ज ईएमआयची रक्कम कमी होते. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कामात कौतुकाची थाप मिळेल, 5 राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी संधी

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT