Nitish Rane : धारावीतील अनधिकृत बांधकाम तातडीने पाडा, अन्यथा तिथे जाऊन मंदिरे बांधू; आमदार नितेश राणे संतापले

Nitesh Rane on Dharavi Rada : मुंबईच्या धारावी परिसरात असलेल्या एका मशि‍दीच्या अनधिकृत बांधकामावरून मोठा तणाव निर्माण झाला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला.
Nitesh Rane on Dharavi Rada
Nitesh Rane on Dharavi RadaSaam TV
Published On

मुंबईच्या धारावी परिसरात असलेल्या एका मशि‍दीच्या अनधिकृत बांधकामावरून मोठा तणाव निर्माण झाला. बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत जमावाने हुज्जत घातल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर, जमावाकडून महापालिकेच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला.

Nitesh Rane on Dharavi Rada
Dharavi News : धारावीत मोठा तणाव! संतप्त जमावाकडून महापालिकेच्या वाहनांची तोडफोड, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

मुंबईच्या धारावी परिसरात असलेल्या एका मशि‍दीच्या अनधिकृत बांधकामावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत जमावाने हुज्जत घातल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर, जमावाकडून महापालिकेच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

सिंधुदुर्ग येथील जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, "आज शुक्रवारी सकाळी धारावीत जिहादी मानसिकतेचे उदाहरण दिसून आले. यांना शरिया कायदा लागू करायचा आहे. अतिक्रमण तोडायला जिहाद्यांनी दिले नाही. कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केली, महापालिकेच्या गाड्या फोडल्या. आज मुंबईत लाख भर उदाहरणे आहेत. मंदिरे जर अनधिकृत असतील आमचे बांधव काही करीत नाहीत. मात्र हे जिहादी गाड्या फोडतात".

आमचा मशि‍दीला विरोध नसून फक्त अनधिकृत बांधकामास विरोध आहे. पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांना सांगतो कारवाई करा. अन्यथा आम्ही हिंदू धारावीत आक्रमक होऊ. जिहादींना वेगळा न्याय नको. मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही धारावीत जाऊन तिथे मंदिर बांधू.आजची धारावी घटना उदाहरण आहे की, आमचे खायचे आणि शिरिया कायदा पाळायचा, असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला.

माझी लढाई जिहादीविरोधात आहे.

भाजप नेते नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळविल्यानंतर विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला, परधर्मीय लोकांची पूजा, मंदिरे उध्वस्त केली नाही. विरोधकांच्या स्त्रियांचा सन्मान केला यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, छत्रपतींच्या विचाराने चालणारे आम्ही आहोत. हिंदू स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली. ज्या मुघलांनी आणि इस्लामिक आमची असंख्य मंदिरे तोडली, असंख्य भगिनींची अब्रू लुटली. त्याच्या विरुद्ध स्वराज्य उभे केले. त्यामुळे असा आदर्श राजा होणे नाही. त्यामुळे मी नितीन गडकरी यांच्या मतांशी पूर्ण सहमत आहे", असंही आमदार नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane on Dharavi Rada
Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com