PF Nominee Rules Saam Tv
बिझनेस

PF Nominee Rules: PF खात्यात नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या 'हा' नियम

PF Nominee Rules: PF खातेदाराचा नॉमिनी नोंदवण्याआधी मृत्यू झाल्यास पैसे बुडत नाहीत. पात्र कुटुंबीय किंवा कायदेशीर वारस दावा करू शकतात. जाणून घ्या PF नॉमिनीचे नियम आणि ई-नॉमिनेशन प्रक्रिया.

Shruti Vilas Kadam

PF Nominee Rules: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हा भविष्यातील आर्थिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून पगारदार कर्मचाऱ्यांच्या PF खात्यांचे व्यवस्थापन केले जाते. नोकरीदरम्यान जमा झालेली ही रक्कम भविष्यात उपयोगी पडते. त्यामुळे PF खात्याला योग्य वेळी नॉमिनी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनेकदा काही कारणांमुळे कर्मचारी PF खात्यावर नॉमिनीची नोंदणी न करताच मृत्यू पावतो. अशावेळी खात्यात जमा असलेली PFची रक्कम किंवा संबंधित विम्याची रक्कम सरकारजमा होते का, असा प्रश्न कुटुंबीयांना पडतो. मात्र, नॉमिनीची नोंद नसल्यामुळे खात्यातील पैसे थेट बुडत नाहीत. परंतु हे पैसे मिळवण्यासाठी कुटुंबीयांना आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर वारसाहक्काशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते.

नॉमिनी नसल्यास पैसे कोणाला मिळतात?

PF खात्यावर नॉमिनी नोंदवलेला नसेल, तर मृत कर्मचाऱ्याचे पात्र कुटुंबीय किंवा कायदेशीर वारस दावा करू शकतात. अशा वेळी संबंधित वारसदारांना आवश्यक कागदपत्रांसह EPFOकडे अर्ज करावा लागतो. पात्र सदस्यांची पडताळणी केल्यानंतर नियमांनुसार PFची रक्कम त्या संबिधीत व्यक्तीकडे दिले जातात. कुटुंबातील पात्र सदस्यांमध्ये मृत कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, मुले तसेच लागू नियमांनुसार आई-वडील यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन PF खात्यातील नॉमिनीची माहिती अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

ई-नॉमिनेशनमुळे प्रक्रिया सोपी

EPFOने PF खात्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कर्मचारी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने नॉमिनीची माहिती अपडेट करू शकतात. नॉमिनेशन केल्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना PF, पेन्शन आणि विम्याशी संबंधित लाभ मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Restaurant Price Hike : खवय्यांच्या खिशाला बसणार फटका! हॉटेल - रेस्टॉरंटमधील जेवण महागणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

Supreme Court : मोठी बातमी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, राहुल गांधींनाही फटकारले

Shocking : भीषण दुर्घटना! शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एका शिक्षिकेचाही समावेश

SCROLL FOR NEXT