PF Interest google
बिझनेस

EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक

EPF Interest Rate: EPFO कडून आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. तुमच्या पीएफ खात्यात व्याज जमा झालंय का हे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन कसं तपासायचं ते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रत्येक कर्मचारी त्याच्या पगारातला काही टक्के भाग हा पीएफमध्ये जमा करतात. याचा भविष्यात रिटायरमेंटनंतर किंवा गरजेच्या वेळी खूप फायदा होतो. पूर्वी (EPFO ) पीएफ काढण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत होत्या. आता ही प्रोसेस खूप सोपी झाली आहे. त्यासाठी आता घरबसल्या अधिकृत वेबसाइटवरून सर्व माहिती तुम्ही काढू शकता. त्यातच आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे.

सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय श्रम आणि मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत PF चा ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग तिसऱ्या वर्षी हा व्याजदर स्थिर ठेवण्यात आला आहे.

PF खाते नियमित तपासणे का महत्त्वाचे? (Why is it important to check PF account regularly?)

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी EPF ठेवींवर ८.२५ टक्के रक्कम व्याज जमा करण्याची परवानगी दिली आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे EPF खाते तपासत राहीले पाहिजे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणं सोपं होऊ शकतं. तसेच अचानक आर्थिक गरज पडली की खात्यात किती रक्कम जमा आहे याची माहिती मिळते.तुम्हाला पीएफ तपासता येत नसेल तर तुम्ही पुढील काही स्टेप्स फॉलो करून संपूर्ण माहिती मिळवू शकता.

ऑनलाइन PF बॅलन्स तपासण्याची सोपी स्टेप (how to check pf balance)

ऑनलाइन पद्धतीने पीएफ तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्यासाठी सर्वप्रथम EPFO च्या पासबुक पोर्टलला भेट द्या. पुढे UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. मग कॅप्चा भरल्यानंतर PF खाते निवडा. त्यानंतर तुमच्या खात्यातली शिल्लक रक्कम आणि व्यवहारांची माहिती दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT