PF News Saam Tv
बिझनेस

PF Calculation: PF खात्यात किती पैसे जमा होतात? निवृत्तीनंतर किती मिळणार पेन्शन; कॅल्क्युलेशन वाचा

PF Calculation: पीएफ खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जातात. यातील काही रक्कम ही पेन्शनसाठी दिली जाते. तुम्हाला तुमच्या पगाराच्या आधारावर पेन्शन मिळते. जाणून घ्या कॅलक्युलेशन.

Siddhi Hande

कोणत्याही क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट (PF Account) हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम तुम्हाला रिटायरमेंटनंतर एकरकमी मिळते. तर त्याचसोबत काही रक्कम पेन्शनसाठी मिळते. या पीएफ अकाउंटमध्ये वयाच्या ६० वर्षानंतर तुम्हाला किती पेन्शन (Pension) मिळणार हे जाणून घ्या.

पेन्शनबाबत ईपीएफओचे काही नियम आहेत. त्याअंतर्गत तुम्हाला पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम कशी कॅलक्युलेट करतात तसेच तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर किती पैसे मिळणार याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पीएफ खात्यात पैसे (PF Account)

जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. यातील ८.३३ टक्के पैसे पेन्शन फंडमध्ये जातात. तर ३.६७ टक्के पैसे पीएफ खात्यात जमा होतात.

पेन्शनचे नियम (Pension Rule)

जर तुम्ही १० वर्षे पीएफ खात्यात योगदान देत आहात तर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. तुम्ही ५० व्या वर्षी पेन्शनसाठी क्लेम करु शकतात.परंतु यासाठी दरवर्षी ४ टक्क्यांनी कपात केली जाईल. तुम्हाला वयाच्या ५८ वर्षानंतर पूर्ण पेन्शन मिळते.

पेन्शनचे कॅलक्युलेशन (Pension Calculation)

EPFO च्या नियमानुसार, पेन्शनसाठी सॅलरी १५००० रुपये असावी. यातील दर महिन्याला १५०००x८.३३/१०० =१२५० रुपये पेन्शन फंडमध्ये जमा होतात. यामध्ये तुम्ही जेवढे वर्ष काम केले ते अॅड केले जाते. त्या हिशोबाने तुम्हाला पेन्शन मिळते.

किती मिळणार पेन्शन?

जर तुम्ही २३ व्या वर्षी नोकरी करायला सुरुवात केली. तर तुम्ही ३५ वर्षे काम करणार आहे. यामध्ये तुमचे वेतन १५००० रुपये आहे. तुम्ही ३५ वर्षे काम केले. तर १५०००x३५/१००= ७५०० रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. यामध्ये ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT