Petrol Diesel Price Hike  google
बिझनेस

Petrol Diesel Price Hike : मुंबईकरांवर आर्थिक संकट! पेट्रोल ₹१०८, डिझेल ₹९५; ऑटो-टॅक्सीचा प्रवासही महागणार

Petrol Diesel Price Hike Mumbai: सर्वसामान्यांना आता मोठ्या महागाईला सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईकरांना आता पेट्रोल- डिझेलच्या खरेदीसाठी वेगळी बचत करावी लागणार आहे. कारण याचे वाढते दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. कालच्या दरांमध्ये एकूण आठ दिवसांमध्ये 4 रुपयांने वाढ झाली होती. हा आकडा आता वाढला आहे. २३ मे पासून हा दर १०७.६ रुपयांवरून १०८.५ रुपये प्रति लीटर झाला. तर डिझेलच्या किंमती ९४.१ रुपयांवरून ९५ रुपयांवर हा दर पोहोचला आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती

तेल कंपन्यांच्या (Oil Marketing Company)सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. त्यात इंधन विक्रेत्यांवर दबाव आला आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढू शकतील. हा तोटा भरून काढण्यासाठी ते पंपावरचे दरांमध्ये वाढ करत आहेत.

पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढणार का?

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम फक्त वाहन चालकांवर होणार नाही. तर वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर जास्त आर्थिक भार पडत आहे. तसेच याचा अंदाज घेता देशात महागाई वाढताना दिसत आहे. याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसणार आहे. पुढील माहितीत आपण मुंबईसह इतर शहरांमधील दर जाणून घेणार आहोत.


आजचे पेट्रोल डिझेलचे दर किती?

मुंबईत पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०८. ४५ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.०२ इतका आहे.

पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०८.९८ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.५७ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.२९ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५. ८६ रुपये इतका आहे.

सोलापूरमध्ये पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.९५ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९६.५२ रुपये इतका आहे.

ठाण्यात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.३१ रुपये आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.८५ रुपये इतका आहे.

कोल्हापूरमधील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९. ३६ आहे. तर डिझेलचा आजचा दर ९५.०५ इतका आहे.

दिल्लीतील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर ९९.५१ आहे. तर डिझेलचा आजचा दर ९२.५९ इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga water: गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही का?

Famous Influencer : सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन; Reel मधून पैसा अन् सोनं दाखवलं, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

SCROLL FOR NEXT