Petrol Diesel Price Hike Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Hike:ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार? जाणून घ्या का वाढू शकतात किंमती

Petrol Diesel Price Hike Due To Crude Oil: देशात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढू शकतात.

Siddhi Hande

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे.कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता होती. मात्र, अजूनपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणने इस्त्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर आशियामध्ये युद्ध होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एका दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किंमती २४ टक्क्यांनी घसरल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कच्चे तेल ६६ डॉलक प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा ब्रेंट क्रूड ऑइल ७५.७९ डॉलरवर विकले जात आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू शकतात.जर तेल १० डॉलरने महागले तर ०.३ टक्क्यांनी महागाईचा दर वाढतो. १ डॉलरने कच्च्या तेलाचे दर वाढले तर ५० ते ६० पैशांनी पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतात. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, याची शक्यता कमी आहे. (Petrol Diesel price)

कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांची ओपेक ही प्रमुख संघटना आहे. या संघटनेत इराण, सौदी अरेबिया असे अनेक देश आहेत. यात इराणचे मोठे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इस्त्रायल आणि इराणचे युद्ध असेच सुरु राहिले तर कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार. परिणामी पेट्रोल डिझेलच्या किंमतीदेखील वाढणार आहेत. (Petrol Diesel Price Hike)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT