आखाती देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या
पेट्रोल डिझेलच्या दरावर परिणाम
आज पेट्रोल डिझेलचे दर काय?
केंद्र सरकारने १५ मे रोजी पेट्रोल डिझेलचे दर वाढवले. पेट्रोलचे दर ३ रुपयांनी वाढले होते. त्यानंतर काल पुन्हा दिल्लीत पेट्रोलचे दर १ रुपयांनी वाढले. भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. इराण अमेरिका युद्धामुळे हे दर वाढत आहेत.
इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती १०० रुपयांपेक्षा जास्त वाढू शकतात.जर असे झाले तर पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. दरम्यान, आज पेट्रोल डिझेलच्या दरात फार काही बदल झालेला नाही.
महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोलचे दर ९७.७७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.६७ रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोलचे दर १०६.६८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.१४ रुपये
कोलकत्त्यात पेट्रोलचे दर १०८.७० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.१३ रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोलचे दर १०३.६७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.२५ रुपये प्रति लिटर
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price in Maharashtra)
पुण्यात पेट्रोलचे दर १०७.९१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.३९ रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोलचे दर १०७.०८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.५३ रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचे दर १०७.३० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.८१ रुपये प्रति लिटर
साताऱ्यात पेट्रोलचे दर १०७.७१ रुपये तर डिझेलचे दर ९४.२० रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०७.९० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.३८ रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०७.२९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.८३ रुपये प्रति लिटर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.