Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव काय?

Petrol Diesel Price Today 31st August 2024: देशात आज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. तुमच्या शहरातील इंधनाचे भाव चेक करा.

Siddhi Hande

देशात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करतात. काही दिवसांनी सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. त्यामुळे अनेकजण स्वतः चे खाजगी वाहन घेण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव माहित असणे गरजेचे आहे. पेट्रोल डिझेलचे भाव बदलत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.आज WTI क्रूड ऑइल ७३.५५ डॉलर प्रति बॅलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ७८.८० डॉलर प्रति बॅलरवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

आज पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १०३.७६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.२९ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.८९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.०९ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटरवर विकले जत आहे तर डिझेलची किंमत ९०.७० रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७३ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०४.९९ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९१.४८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.३४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर वाहनांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना लॉटरी लागणार! एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार; मार्च-एप्रिल हप्त्याची अपडेट

तामिळनाडूत टीव्हीकेचा ब्लॉकबस्टर 'विजय'; थलपतीची राजकारणात दणदणीत एंट्री, DMK-AIDMK ला धक्का

Thalapathy Vijay: तामिळनाडूचा 'ज्युनिअर एमजीआर'! विजय थलपती कसा बनला जुनिअर MGR?

MI Vs LSG: सलग तीन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; IPLमध्ये मुंबईचं आव्हान कायम

SCROLL FOR NEXT