Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं; मुंबई पुणे ते नागपूर, कोणत्या शहरात किती किंमती?

Petrol Diesel Price Today Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या तीन दिवसांपासून सलग वाढ होताना दिसत आहे. आजदेखील पेट्रोल महागलं आहे. महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले

आज पेट्रोल ९४ पैसे तर डिझेल ९१ पैशांनी वाढले

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा

पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीदेखील वाढत आहे. आज पेट्रोलच्या दरात ९४ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात पेट्रोलचे दर वाढले आहेत.

याआधीही दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर ३ रुपयांनी वाढले होते. त्यानंतर लगेचच आजदेखील हे दर वाढले आहेत. तीन दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

पुणे

पुण्यात पेट्रोलचे दर आता १०७.८९ प्रति लिटर तर डिझेल ९४.३९ प्रति लिटर

नाशिक

नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०८.८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.३५ रुपये प्रति लिटर

परभणी

परभणीत पेट्रोलचे दर १०९.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटर

नागपूर

नागपूरात पेट्रोलचे दर १०८.०७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.६३ रुपये प्रति लिटर

मुंबई (Petrol Diesel Price in Mumbai)

मुंबईत पेट्रोलच्या किंमती १०७.५९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.०८ रुपये प्रति लिटर

ठाणे (Petrol Diesel Rate Thane)

ठाण्यात पेट्रोलचे दप १०७.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.४७ रुपये प्रति लिटर

वाशिम

वाशिममध्ये पेट्रोलच्या किंमती १०९ रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमती ९.५३ रुपये प्रति लिटर

सोलापूर

सोलापूरात पेट्रोलचे दर १०८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.९३ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर १०९.१० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.५८ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT