Petrol Diesel Rate Falls Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Falls: आनंदाची बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर घसरले; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate 29th June 2024: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील अनेक शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे नवे दर.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात अनेक शहराती पेट्रोल डिझेलच्या भावात घट झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. २८ जून रोजी अजित पवारांनी राज्याचे अर्थसंकल्प जाहीर केले. या अर्थसंकल्पात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील पेट्रोल डिझेलवरील वॅट कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६५ पैशांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

राज्यात पेट्रोल ६५ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल २.६० रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे. पेट्रोल डिझेलवर लागलेल्या वॅट करामुळे किंमती वाढल्या होत्या. मात्र, आता या किंमती घसरल्या आहेत.

देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत १ लिटर पेट्रोलची किंमत ९४.७६ रुपये आहे. तर डिझेल ८७.६६ प्रति लिटर झाले आहे. मुंबईत (Petrol Diesel Rate In Mumbai) पेट्रोलची किंमत १०३.४३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.९५ रुपये आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपये तर डिझेलची किंमत ९०.७४ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७३ रुपये तर डिझेल ९२.३२ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोल (Petrol Price in Pune)१०३.७६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९०.३० रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९१.२६ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपये तर डिझेल १०३.९६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेल ९०.८६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६२ रुपये आहे. तर डिझेल ९०.१४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT