एप्रिल महिना सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात पेन्शन सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. १ एप्रिलपासून नवीन पेन्शन सिस्टीम लागू होणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम निवडता येणार आहे. या स्कीमचा लाभ एनपीएसअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. याचसोबत त्यांना एनपीएस किंवा यूपीएस अशा दोन्हींपैकी एक पेन्शन सिस्टीम निवडता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला कोणती पेन्शन सिस्टीम तुमच्यासाठी चांगली आहे याबाबत माहिती देणार आहोत.
UPS नक्की आहे तरी काय?
युनिफाइड पेन्शन स्कीमअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक निश्चित पेन्शन दिली जाते. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या १२ महिन्यातील बेसिक सॅलरीमध्ये ५० टक्के असणार आहे. यासाठी तुम्हाला कमीत कमी २५ वर्षे सर्व्हिस करावी लागणार आहे. जर कोणत्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांनादेखील ही पेन्शन मिळणार आहे. यामध्ये जर तुम्ही १० वर्षांसाठी नोकरी केली तर तुम्हाला कमीत कमी १० हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे,
सरकारी योगदान किती असणार?
एनपीएसअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारातील १० टक्के रक्कम द्यावी करावे लागणार आहे. त्यात सरकारकडून १४ टक्के कॉन्ट्रिब्युशन दिले जाणाप आहे. युनिफाइड पेन्शन योजनेत सरकारकडून बेसिक सॅलरीच्या १८.५ टक्के योगदान दिले जाईल. या योजनेचा २३ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. युनिफाइड पेन्शन योजनेत महागाई भत्तादेखील दिले जाणार आहे.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) काय आहे?
नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme) ही २००४ रोजी सुरु केली होती. या योजनेत प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचारीदेखील लाभ घेऊ शकतात. देशात कुठूनही तुम्ही हे अकाउंट वापरु शकतात. या योजनेअंतर्गत येणारे कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीमचा लाभ घेऊ शकतात.
NPS आणि UPS मध्ये फरक
युनिफाइड पेन्शन योजनेत (Unified Pension Scheme)कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे. जी रिटायरमेंटच्या १२ महिन्यांच्या बेसिक सॅलरीची अर्धी रक्कम असणार आहे.तर नॅशनल पेन्श योजनेत रिटर्न हा शेअर बाजारावर अवलंबून असतो. जो कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
यूपीएस आणि एनपीएसमध्ये १० टक्के योगदान द्यावे लागणार आहे. एनपीएसमध्ये १४ टक्के योगदान तर युनिफाइड पेन्शन योजनेत १८.५ टक्के योगदान दिले जाणार आहे.
यूपीएस योजनेअंतर्गत २५ वर्षे सर्व्हिस केल्यानंतर ठरावीक पेन्शन दिली जाते. तर एनपीएसमध्ये कोणतीही निश्चित पेन्शन ठरलेली नसते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.