सध्याच्या काळात मुघलांच्या वंशजांना किती पेन्शन मिळते?

Surabhi Jayashree Jagdish

शेवटच्या मुघल शासक

सुलताना बेगम या स्वत: ला शेवटच्या मुघल शासक बहादूर शाह जफरच्या नातवाची पत्नी असल्याचं सांगतात.

पेन्शन

त्यांनी सांगितलं की, नेहरूजींनी 1960 मध्ये बहादूर शाह जफरच्या वंशजांसाठी 250 रुपये पेन्शन निश्चित केली होती.

पेन्शनमध्ये वाढ

कालांतराने सरकार बदललं तसं सुलताना बेगम यांच्या पेन्शनमध्येही वाढ झाली. आता त्यांना दर महिन्याला 6,000 रुपये मिळतात.

घरभाडं

यातील अडीच हजार रुपये भाड्यासाठी खर्च होतात. त्यामुळे उर्वरित खर्च भागवणं त्यांच्यासाठी कठीण झालंय.

जास्त पेन्शनची मागणी

सुलताना सांगतात की, त्यांनी सरकारकडे 10,000 रुपये पेन्शनची मागणी केली होती, पण ती पूर्ण झाली नाही.

गरजा भागवतात

पुस्तक बांधणी, बांगड्या बनवणं किंवा इतर काम करून त्या आपल्या गरजा पूर्ण करत आहेत.

पतीचं नाव

सुलताना यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या पतीचे नाव मिर्झा मोहम्मद बेदर बख्त होते आणि त्यांचा जन्म रंगूनमध्ये 1920 मध्ये झाला होता.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा