पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेला प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसे यांचा जावई आहे.
गिरीश महाजन यांनी थेट आरोप करत म्हटले की, खेवलकरच रेव्ह पार्टीचा आयोजक होता.
त्यांनी खडसेंना उद्देशून विचारलं – जर ट्रॅप होत असेल, तर त्यांनी जावयाला आधीच सावध का केलं नाही?
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Kharadi Rave Party News : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहाथ पकडलं अन् महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. खराडीमधील अलिशान फ्लॅटमध्ये प्रांजल ३ महिला आणि मित्रासोबत नशेत धुंद होते. पोलिसांनी धाड टाकत सर्वांना ताब्यात घेतले, याप्रकरणी एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच ही रेव्ह पार्टी आयोजित केली होती, असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला आहे.
पुण्यात रेव्ह पार्टीचा विषय मोठा होत चालला आहे. खराडीमधील प्रकरणाबाबत माझा पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही. पण नाथाभाऊचे जावाई रेव्ह पार्टीत होते, असे समजले. तेच या रेव्ह पार्टीचे आयोजक असल्याची माहिती मला मिळाली आहे, असे महाजन म्हणाले. प्रांजल खेवलकर यांनीच या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. तो काही ट्रॅप होईल असे वाटत नाही. खेवलकर हा ट्रॅप होईल, असे वाटत असेल तर त्याला खडसेंनी अलर्ट का केले नाही? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.
हुक्क्याचा बार लावला होता, तपासाअंती समोर येईल. नाथाभाऊने जावई बापूंना अलर्ट करायचे होते ना? जे झालंय ते मान्य करायला पाहिजे. ज्याने चूक केली तर गळ्यात पडेल. प्रत्येक वेळी षषडयंत्र आपल्या सोबतच का होतं? फोन तपासले तर सगळे कळेल. जावईला कडेवर घेऊन थोडी कुणी घेऊन गेलं. चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे महाजन म्हणाले.
पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये नेमकं काय झालं?
पुण्यातील खराडी येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री अचानक धाड मारली अन् रेव्ह पार्टी उधळून लावली. या पार्टीमधून पोलिसांनी तीन महिला आणि ४ जणांना ताब्यात घेतले, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण यामध्ये राजकीय कनेक्शन समोर आले आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली अलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टीमधून अंमली पदार्थ, दारू, हुक्का पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची ससून रूग्णालयात वैदकीय तपासणी करण्यात येत आहे. या रेव्ह पार्टीमध्ये खडसेंचे जावई असल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. खडसेंच्या जावयाला महाजन यांनी अडकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर महाजन यांनी जर तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकणार माहिती होते, तर अलर्ट का केले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.