Paytm Service Saam Digital
बिझनेस

Paytm Payment: पेटीएम पेमेंट्सला मोठा धक्का! EPFO खातेधारकांना कोणतेही व्यवहार करण्यास मनाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Epfo Paytm Payment Will Discontinue:

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स या बँकिग अॅपवर कारवाई केली आहे. त्यामुळे कंपनीला सर्व प्रकारचे कॅश डिपॉझिट आणि पेमेंट बंद करण्यास सांगितले आहे. पेटीएम या अॅपवरुन डिजिटल पेमेंट न करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आता कर्मचारी निर्वाह निधी संघटना (EPFO) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या EPFO खातेधारकांचे पेटीएम पेमेंट्स बँकेत खाते आहे. त्यांच्या ठेव आणि क्रेडिट व्यव्हारांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता EPFO कर्मचारी या अॅपद्वारे पेमेंट करु शकणार नाहीत.

याबाबत ८ फेब्रुवारीला एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये २३ फेब्रुवारी २०२४ पासून पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडशी संबंधित खात्यांचे क्लेम स्विकारण्यास मनाई केली आहे. (Latest News)

मागील वर्षी EPFO ने बँकिंग विभागाला पेटीएम पेमेंट्स बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक या खात्यांमध्ये ईपीएफ पेमेंट करण्याची परवानगी दिली होती. परंतु पेटीएम पेमेंट्सवर झालेल्या कारवाईनंतर या खात्यांमध्ये पेमेंट्स करणे बंद करण्यात आले आहेत.

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही घ्राहकाच्या खात्यात कोणतेही व्याज, कॅशबॅक, परतावा, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड याशिवाय कोणताही क्रेडिट व्यव्हार किंवा टॉप अप होणार नाही. ग्राहकांना सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, प्रीपेड अकाउंट, फास्टॅग, नॅशनल मोबिलिटी कार्डमधून शिल्लक रक्कम काढण्याची परवानगी दिली जाईल.

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएममचे शेअर्स घसरले

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT