Paytm FASTag Closed Saam Tv
बिझनेस

Paytm FASTag Close: आजपासून बंद, तुमचे पैसे कसे मिळणार परत? जाणून घ्या

Paytm Fastag Last Date: पेटीएम पेमेंट्स बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लादलेल्या निर्बंधांमुळे पेटीएम फास्टॅग यापुढे वापरता येणार नाही.

साम टिव्ही ब्युरो

Paytm FASTag News:

पेटीएम पेमेंट्स बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लादलेल्या निर्बंधांमुळे पेटीएम फास्टॅग यापुढे वापरता येणार नाही. याचा अर्थ जे युजर्स पेटीएम फास्टॅग अकाउंट वापरत होते, ते यापुढे टॉप अप करू शकणार नाहीत. आता जुन्या फास्टॅ युजर्सचे पैसे परत कसे मिळणार, याबद्दल आता कंपनीने स्वतः माहिती दिली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, युजर्स अजूनही त्यांच्या पेटीएम FASTag मधील शिल्लक रक्कम टोल किंवा पार्किंग भरण्यासाठी वापरू शकतात. सध्याची रक्कम संपल्यास, कोणत्याही रिचार्ज किंवा टॉप-अपला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे पैसे संपताच फास्टॅग बंद होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय नाही

फास्टॅग बंद झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी यूजर्सना दुसरा फास्टॅग घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. Paytm FASTag मधील शिल्लक पैसे नवीन FASTag वर ट्रान्सफर करण्याचा कोणताही पर्याय नाही. असं असलं तरी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवता येऊ शकतात. कंपनीने आपल्या वेबसाइटवर स्पष्ट केले आहे की, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळू शकता.  (Latest Marathi News)

अशा प्रकारे मिळवू शकतात पैसे परत

1. सर्वात आधी पेटीएम ॲप ओपन करा आणि सर्च मेनूमध्ये 'मॅनेज फास्टॅग' टाइप करून शोधा.

2. 'मॅनेज फास्टॅग' सेक्शनमध्ये तुम्हाला पेटीएम पेमेंट्स बँक फास्टॅगशी जोडलेल्या सर्व फास्टॅग आणि वाहनांची यादी दिसेल.

3. येथून तुम्हाला सर्वात वरती उजवीकडे दिसणाऱ्या 'क्लोज फास्टॅग' पर्यायावर टॅप करावे लागेल.

4. यानंतर, तुम्हाला संबंधित वाहन क्रमांक निवडावा लागेल ज्यासाठी FASTag बंद करायचा आहे.

5. नेक्स्ट वर टॅप केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.

6. यानंतर फास्टॅग 5-7 दिवसात बंद होईल.

फास्टॅग बंद होताच त्यात असलेली रक्कम आणि सिक्युरिटी मनी पेटीएम वॉलेटमध्ये उपलब्ध होईल आणि इतर सेवा किंवा रिचार्जसाठी वापरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT