Onion Price 
बिझनेस

Onion Price: कांद्यानं वाढवलं सरकारचं टेन्शन; प्रयत्न करूनही कमी होईनात दर,प्रशासन कसा देणार 'फोडणीचा तडका'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आतोनात प्रयत्न केले जात आहेत. तरीही कांद्याचे दर कमी होईनात. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात कांद्याचे दर कमी होण्याची चिन्हे काही दिसेनात. होलसेल मार्केटमध्ये सुद्धा कांद्याचे दर ७० ते ८० रुपये किलोच्या आसपास आहेत. तर काही राज्यात कांद्याचे कमीत कमी दर २७ रुपये प्रति किलो आहे. याप्रमाणे देशभरात कांद्याचे सरासरी दर ४९.९८ रुपये किलो आहेत.

कांद्याचे दर गगनाला भिडल्यानंतर सामान्य जनतेमधील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले गेले.त्यानुसार सरकराने कमी दरात कांद्याची विक्री करण्याचं ठरवलं.यात दिल्ली-एनसीआर,मुंबईमध्ये ३५ रुपये किलोच्या हिशोबाने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जेणेकरून सामान्य जनतेवर महागाईची मार पडू नये.

मागील १० दिवसात दिल्लीच्या बाजारात कांद्याच्या दरात ५ ते ७ रुपयांची वाढ झाली. तर इतर राज्यातील बाजारात कांद्याच्या दरात ३ ते ५ रुपयांची वाढ झाली. ऑगस्ट ३१ तारखेपर्यंत कांद्याच्या किमतीत ५५ रुपये किलो दर झाला होता. तर सप्टेंबर १० तारखेपर्यंत कांदा प्रतिकिलो ५८-६० रुपये दराने विकला जात आहे.

का वाढले कांद्याचे दर

कांद्याची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर का वाढले याचे कारण सांगितले आहे. मागील श्रावण महिन्यात कांद्याचे दर कमी झाले होते. परंतु आता परत दरात वाढ झालीय. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने कांद्याच्या मालाची वाहतूक होऊ शकली नाहीये. रस्ते वाहतूक बंद असल्याने मालवाहतूक करणारे ट्रक अडकून पडले ते वेळेवर पोहोचून शकले नाहीत. त्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचं कारण व्यापाऱ्यांनी दिलंय.

दरम्यान यावर्षाच्या खरीप हंगामात कांद्याची लागवड १०२ टक्के झालीय. त्यामुळे येत्या काळात कांद्याचा पुरवठा अधिक होण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कांद्याचे दर ४९.९८ रुपये किलो होते.

दरम्यान सरकारकडे ४.७ लाख टन कांद्याचा साठा आहे. सरकारी यंत्रणा नाफेड आणि एनसीसीएफ कमी आणि स्वस्त दरात कांद्याची विक्री करत आहे.सरकार भविष्यातही अशाचप्रकारे कमी दरात कांद्याची विक्र करत राहील तर कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT