Bank Account Saam tv
बिझनेस

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

Bank Account Rules: अनेकांचे दोन बँक अकाउंट असतात. त्यातील एकच अकाउंट ते वापरतात. दुसऱ्या अकाउंटवरुन कोणतेही ट्रान्झॅक्शन होत नाही. तर हे अकाउंट बंद करणेच जास्त योग्य ठरते अन्यथा तुमच्या खिशाला फटका बसू शकतो.

Siddhi Hande

प्रत्येकाचे बँकेत अकाउंट हे असते. अनेकदा काही जणांचे दोन-तीन बँक अकाउंट असतात. त्यातील एकच अकाउंट वापरले जाते. इतर अकाउंटवरुन कोणतंही ट्रान्झॅक्शन होत नाही. काहीजण तर आपले दोन अकाउंट आहे हे विसरुनच जातात. मात्र, या अशा चुकीमुळे तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो. जे अकाउंट वापरात नसेल ते बंद करणे जास्त योग्य ठरेल. अन्यथा तुम्हाला चांगलाच फटका बरू शकतो.

मिनिमम बॅलेंस न ठेवल्या दंड

तुम्ही जर तुमच्या बँक खात्यात मिनिमम बँलेस ठेवला नाही तर तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो. तुम्हाला मिनिमम बँलेस ठेवणे अनिवार्य आहे अन्यथा दर महिन्याला दंड भरावा लागतो. यामुळे अनेकदा तुमच्या बँक खात्यातील पैसे संपतात आणि तुमचे अकाउंट निगेटिव्हमध्ये जाते.

बऱ्याच काळापासून जर तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन केले नाही किंवा मिनिमम बँलेंस ठेवला नाही तर अकाउंट इनअॅक्टिव्ह किंवा डोरमेंट होऊ शकते. हे अकाउंट पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम

तुम्ही जर बँक अकाउंट बंद केले तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. जर तुमच्या खात्यात ओवरड्राफ्ट सुविधा असेल त्यात जर कोणतेही शुल्क किंवा व्याज जमा झाले नाही तर ते अनपेड लोन मानले जाऊ शकते.यामुळे क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला लोन घेण्यास अडचणी येऊ शकतात.

हे काम आजच करा

स्टेटमेंट डाउनलोड करा

तुम्ही तुमच्या अकाउंटचे मागच्या २-३ वर्षांचे स्टेटमेंट डाउनलोड करा. हे स्टेटमेंट टॅक्सच्या कामासाठी गरजेचे आहे.

लिंक चेक करा

तुमच्या या अकाउंटमध्ये कोणतेही ऑटो डेबिट किंवा सब्सिडी लिंक नाही ना हे चेक करा.

बँक अकाउंट बंद करणे

तुम्ही सर्व पैसे काढून घ्या. याचसोबत बँक खाते बंद करण्यासाठी फॉर्म भरा आणि अकाउंट बंद करुन टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रूपाली चाकणकर यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

Durandhar 2: कोण आहे दाऊद? 'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब'ची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

Gautam Singhania : प्रसिद्ध उद्योगपतीचा स्पीड बोट उलटून भीषण अपघात, रशियन महिलेसह ४ भारतीय वाहून गेले

Gold Rate Today: खुशखबर! सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दर ६००० रुपयांनी घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

World Happiness Report: आनंदी देशांची यादी जाहीर, फिनलंडने मारली बाजी; भारत कितव्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT