Ola S1 X Saam Tv
बिझनेस

Ola च्या सर्वात स्वस्त स्कूटरची डिलिव्हरी सुरू, किंमत फक्त 69999; मिळणार 190Km ची रेंज

Electric Scooter: ओला इलेक्ट्रिकने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने ही ई-स्कूटर 3 बॅटरी पॅकमध्ये लॉन्च केली आहे.

Satish Kengar

Ola S1 X Delivery start:

ओला इलेक्ट्रिकने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने ही ई-स्कूटर 3 बॅटरी पॅकमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh चा समावेश आहे. 2 kWh ची एक्स-शोरूम किंमत 69,999 रुपये, 3 kWh ची किंमत 84,999 रुपये आणि 4 kWh ची किंमत 99,999 रुपये आहे.

कंपनीने अलीकडेच या ई-स्कूटर्सची किंमत कमी केली आहे. अशातच जर तुम्ही ही ई-स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला याच्या फीचर्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

S1 X चे स्पेसिफिकेशन

S1 स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन राइडिंग मोड आहेत. याची टॉप स्पीड ताशी 85 किमी आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 7.4 तास लागतात. यात टचस्क्रीनऐवजी 3.5-इंच एलसीडी स्क्रीन आहे. यात एक फिजिकल की देखील उपलब्ध आहे. जी ॲपच्या मदतीने देखील ऑपरेट केली जाऊ शकते.

S1X च्या 3 kWh मॉडेलची टॉप स्पीड 90 kmph आहे. तसेच सिंगल चार्जवर याची रेंज 151 किमी आहे. 4 kWh बॅटरी पॅकचा टॉप स्पीड देखील 90 kmph आहे. एका चार्जवर याची रेंज 190 किमी पर्यंत आहे.

Ola त्याच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर 8 वर्षे/80,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी देखील देत आहे. ग्राहक 4,999 रुपये देऊन 1,00,000 किलोमीटरपर्यंत बॅटरीची वॉरंटी वाढवू शकतात आणि 12,999 रुपये भरून 1,25,000 किलोमीटरपर्यंत वाढवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

SCROLL FOR NEXT