Ola Electric Roadster e-Bike Saam Tv
बिझनेस

एका चार्जमध्ये मुंबई - नाशिक - मुंबई गाठणार; OLA ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; AI, ADAS फीचरसह किंमतही कमी

Ola Electric Roadster e-Bike: प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक बाईक्सची रेंज लॉन्च केली आहे. यातच याची रेंज किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक बाईक्सची रेंज लॉन्च केली आहे. या बाईक्स गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या Roadster कॉन्सेप्टवर आधारित आहेत. या लाइनअपमधील तीन बाईक रोडस्टर आहेत. या नवीन इलेक्ट्रिक बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. याची डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून सुरू होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. यातच याची रेंज किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात नवी क्रांती

ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक बाईक रोडस्टरचे तीन प्रकार लॉन्च केले आहेत. यामध्ये Roadster, Roadster X आणि Roadster Pro यांचा समावेश आहे. या बाईक्स भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात नवी क्रांती घडवून आणणार, असा दावा कंपनीने केला आहे.

Roadster Pro

रोडस्टर प्रो हे या सीरिजचे टॉप मॉडेल आहे. याची किंमत 8kWh बॅटरीसाठी 1,99,999 रुपये आणि 16kWh बॅटरीसाठी 2,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक फक्त 1.2 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडते, असा दावा कंपनीने केला आहे. याची टॉप स्पीड 194 किलोमीटर प्रति तास असल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक एका चार्जवर 579 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. यात 10-इंच टचस्क्रीन, ADAS सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. याची डिलिव्हरी 2025 पासून सुरू होईल.

Roadster

रोडस्टरची 2.5kWh बॅटरीसाठी 1,04,999 रुपये, 4.5kWh बॅटरीसाठी 1,19,999 रुपये आणि 6kWh बॅटरीची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक 2.2 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड 126 किलोमीटर प्रति तास आहे. ही एका चार्जवर 579 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. यात 7 इंची टचस्क्रीन आणि डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत. याची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल.

Roadster X

रोडस्टर X ची किंमत 2.5kWh बॅटरीसाठी 74,999 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक 2.8 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड 124 किलोमीटर प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक 200 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात 18 इंच अलॉय व्हील आणि 4.3 इंच टचस्क्रीन आहे. याची डिलिव्हरीही पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल.

याशिवाय कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट MoveOS 5 देखील सादर केले आहे. आता ओला मॅप्समध्ये ग्रुप नेव्हिगेशनची सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय ओला स्कूटरमध्ये AI आधारित टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि AI असिस्टंट देखील देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT