प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही स्वप्ने असतात. याबरोबर स्वप्न पूर्ण करण्याची मनात जिद्द देखील असते. परंतु स्वप्ने पूर्ण करताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी असे ही वाटते आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही. पण अनेक व्यक्ती अपयशांवर मात करुन कधीना कधी यशस्वी होताच. असंच यश मुंबईतील काव्या ढोबळे यांनी मिळवले आहे. जाणून घेऊया यांच्या जीवनाची संपूर्ण यशोगाथा.
मुंबईतील काव्या ढोबळे या एक नर्स होत्या. त्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे ठरविले. काव्या यांनी ७५,००० हजार रुपयांची सरकारी नोकरी सोडून शेतीचा व्यवसाय करण्याचा ठरविला. काव्या यांनी जनरल मिडवाइफफरीमध्ये आपली नर्सिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी लोकमान्य म्युनिसिपल आणि सायन हॅास्पिटल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. याबरोबर त्यांनी टाटा कॅन्सर हॅास्पिटलमध्ये देखील दोन वर्षे काम करुन २०१७ मध्ये नर्सिंगची बीएससी पूर्ण केली. यानंतर काव्या यांनी कोरोना काळात देखील सायन हॅास्पिटलमध्ये काम केले. त्या काळात घडणाऱ्या परिस्थितीमुळे त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलला. कोरोना काळात काम करत असताना काव्या यानांही कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी कोरोना सारख्या आजारावर मात केली.
काव्या यांना लहानपणांपासून शेती करण्याची आवड होती. म्हणून त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवून संशोधन करण्यास सुरुवात केली. काव्या यांचे म्हणने आहे की, आपण शेतीत रासायनिक अन्नाची लागवड करतो, यामुळे ते अन्न खाल्याने आपले शरीर कमजोर होते. याबरोबर आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात. कोरोना काळात डोळ्यांनी पाहिलेले एवढे मृत्यू बघून त्यांनी स्वत:च समस्येचे हल सोडवले. काव्या यांनी मुंबईतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर काव्या यांनी पतीच्या गावी जाण्याचे ठरविले. काव्या यांच्या शेती व्यवसायाच्या निर्णयाला त्यांचा पती राजेशची साथ मिळाली.
काव्या यांनी रसायनाशिवाय पिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. काव्या ढोबळे या पुण्यातील जुन्नर दातखिलेवाडी गावात गांडूळ खत तयार करतात. या सर्व गोष्टी बाबत त्यांनी शेतकऱ्यांशी आपला संवाद सुरु केला. याबरोर त्यांनी स्वत:चे कृषी पद्धतींवर YouTube चॅनेल सुरु केले. या YouTube चॅनलच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा मुलाखती देखील घेतल्या. यानंतर त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. काव्या यांच्या अनेक अपयशांना शेवटी यश आले. यानंतर त्यांनी काव्या कृषी ब्रँड अंतर्गत गांडूळ खताची विक्री सुरु केली. यानंतर त्यांच्या या यशात एक शेतकरी ५०,००० रुपयांसह १० रुपये प्रति किलो पाच टन गांडूळ खत खरेदी करण्यास सामील झाला. आज काव्या ढोबळे वर्षाला २४ लाख रुपये कमवत आहे.