NPS Scheme Saam tv
बिझनेस

NPS Scheme: ५० हजारांची पेन्शन अन् ४ कोटी एकाचवेळी; NPS योजनेतील गुंतवणूक करेल मालामाल; कॅल्क्युलेशन वाचा

National Pension Scheme: केंद्र सरकारच्या नॅशनल पेन्शन स्कीमअंतर्गत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ५० हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

नॅशनल पेन्शन स्कीम

दर महिन्याला मिळणार ५० हजारांची पेन्शन

गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला काही ठरावीक रक्कम हवी असते जेणेकरुन त्यांना म्हातारपणात कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील असं नाही. त्यामुळे तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची आहे जिथे तुम्हाला महिन्याला पैसे मिळतील. तुम्ही एनपीएस योजनेत गुंतवणूक करुन ५० हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक केल्यावर कोट्यवधी रुपये मिळू शकतात. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी एकरकमी रक्कमदेखील मिळते आणि पेन्शदेखील मिळते. या योजनेतील ८० टक्के रक्कम तुम्ही सेवानिवृत्तीच्या वेळी काढू शकतात. उर्वरित २० टक्के रक्कमेची अॅन्युटी करु शकतात. अॅन्युटी खरेदी केल्यावर तुम्हाला पेन्शन मिळेल.

५० हजार रुपयांची पेन्शन

तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करुन महिन्याला पेन्शन मिळवू शकतात. तुम्हाला वर्षाला ६ लाखांची पेन्शन मिळू शकते.जर तुम्हाला अॅन्युटीवर ६ टक्क्यांचे व्याजदर मिळाले तरी चांगला फंड तयार होणार आहे. म्हणजेच तुम्हाला ५० हजारांची पेन्शन मिळवण्यासाठी १ कोटी रुपयांचीआवश्यकता असणार आहे.

कॅल्क्युलेशन

तुम्हाला १ कोटी रुपयांची अॅन्युटी खरेदी करावी लागेल. त्यानंतरच महिन्याला ५० हजार रुपये मिळू शकतात. यासाठी तुम्हाला एनपीएस योजनेत कोटी रुपये जमा करावे लागतील. त्यातील ८०टक्के रक्कम काढता येणार आहे.

जर तुम्ही २५ व्या वर्षीपासून गुंतवणूक केली तर तुम्ही एवढा फंड जमा करु शकतात. तुम्हाला ३५ वर्षासाठी १४-१५ हजार रुपये गुंतवायचे आहे. जर तुम्हाला यावर १० टक्के व्याज मिळाले तर कोटी रुपये जमा होणार आहे. यातील ८० टक्के म्हणजे ४ कोटी रुपये तुम्ही काढू शकतात. १ कोटींची अॅन्युटी खरेदी करु शकतात. यानंतर तुम्हाला दर महिन्याला ५० हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दिल्ली हादरली! बापलेकाला नग्न करत अमानुष मारहाण, आरोपींनी महिलेलाही सोडलं नाही; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अग्नीतांडव! ५२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; आगीच्या ज्वाळा अन् किंचाळ्या...

Chapati Tips: चपातीचे मळलेलं पीठ कोरडं पडतंय? फक्त ‘हा’ एक उपाय करा, पीठ दिवसभर राहील मऊ कापसारखे

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? महत्वाची अपडेट समोर

Oscar 2026: भारताचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? करण जोहरचा 'होमबाउंड'ची टॉप १५ मध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT