NPCIL Recruitment Saam Tv
बिझनेस

NPCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; २४५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

NPCIL Recruitment 2026: एनपीसीआयएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

NPCIL मध्ये भरती सुरु

अर्ज कसा करावा?

शिक्षण पूर्ण झाले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. एनपीसीआयएलमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.NPCIL ने रावतभाटा राजस्थान साइटसाठी भरती जाहीर केली आहे.

एनपीसीआयएलमघ्ये २४५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय पदवीप्राप्त उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

एनपीसीआयलमध्ये २४५ पदांसाठी अर्ज करायचा आहे. ट्रेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या फील्डमध्ये ६८-६८ पदे आहेत. प्रोग्रामिंग अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशमन असिस्टंट पदासाठी १० जागा, टर्नर पदासाठी १० जागा, मशीनिस्टसाठी १० पद, वेल्डर पदासाठी ११ जागा आहेत. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

पात्रता काय?

एनपीसीआयएलमधील अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. फिटर पदासाठी फिटर ट्रेडमध्ये पदवी, इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियनमध्ये आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी.

१८ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पदासाठी १ वर्षांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. याचसोबत महिन्याला ९,६०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Fraud Case : प्रसिद्ध अभिनेत्रीची ४७ लाखांची फसवणूक, थेट पोलिसांत घेतली धाव, नेमकं प्रकरण काय?

Shreya Ghoshal : कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याचा श्रेया घोषालला आजही पश्चाताप, नेमकं कोणत्या कारणामुळे गायिका नाराज?

India Tourism : अरावली पर्वतरांगेत घडलाय इतिहास, 'हा' आहे मेवाडच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला

मराठमोळ्या निर्मात्याला बेदम मारहाण, मुंबईतील ऑफिसमध्ये घुसत बॅटने मारले,कलाविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT