EPFO ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. आता तुम्ही एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ काढू शकतात. या नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ (PF) काढण्यासाठी अवघे काही मिनिटे लागणार आहेत. लवकरच ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी सुरु होणार आहे. याबाबत कामगावर व रोजगार विभागाच्या सचिव सुमिता दावरा यांनी माहिती दिली आहे.
सुमिता दावरा यांनी सांगितले की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) आम्हाला यूपीआयबाबतचा प्रस्ताव मिळाला आहे. लवकरच यूपीआय सेवा सुरु करण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. ईपीएफओ आता डेटाबेस तयार करण्यासाठी अनेक टेस्ट घेत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा सुरु होईल आणि युपीआद्वारे पैसे काढता येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पीएफ खातेधारक यूपीआयद्वारे क्लेम करु शकतात. पीएफधारक १ लाखांपर्यंतच्या पीएफसाठी क्लेम करु शकतात. ही प्रोसेस खूप जलद होणार आहे. डेटाबेस तयार करण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा वेळ लागतो. यानंतर यूपीआयद्वारे (UPI) पैसे काढण्याचा ऑप्शन दिला जाईल.
सध्या पीएफसाठी क्लेम करायला दोन ते तीन दिवसांचा वेळ लागतो. यूपीआयशी जर पीएफ खाते जोडले गेले तर काही तासात पीएफचे (PF) पैसे काढता येणार आहे. तसेच नवीन नियमदेखील करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.
एकाचवेळी किती पैसे काढू शकणार? (How Much Money You Can Withdraw One Time)
पीएफ खाते यूपीआयशी लिंक झाल्यावर ७.५ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. पीएफ खातेधारकांना यूपीआयच्या माध्यमातून फक्त १ लाखांपर्यंतची रक्कम लगेच काढता येणार आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.