Nokia G42 5G Vs LAVA Blaze 2 5G Nokia
बिझनेस

Nokia- LAVA कंपनीने आणला १०,००० रुपयांचा दमदार 5G फोन; जाणून घ्या फीचर्स

Nokia G42 5G Vs LAVA Blaze 2 5G: तुम्हाला ५ जी स्मार्टफोन घ्यायचा आहे, पण तुमचा बजेट कमी आहे? तुमच्या बजेटची चिंता नोकिया कंपनीने सोडवलीय. नोकिया कंपनीने स्वस्तात आणि मस्त फोन आणलाय. Lava कंपनीनेही या किंमतीत उत्तम फीचर्सवाला फोन आणलाय.

Bharat Jadhav

Nokia G42 5G Vs LAVA Blaze 2 5G:

तुम्हाला १० हजार रुपयांमध्ये 5 जी वाला मोबाईल घ्यायचा असेल तर नोकिया आणि लाव्हा कंपनीने 10 हजार रुपयात नवीन मोबाईल लॉन्च केली आहेत. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्येच हा फोन लॉन्च केला होता पण आता कंपनीने या फोनचा नवीन ४ GB रॅम वेरिएंट लॉन्च केलाय या किंमतीच्या श्रेणीमध्ये LAVA Blaze 2 5G चाही मोबाईल बाजारात उपलब्ध आहे.(Latest News)

नोकिया G42 5G चे वैशिष्ट्ये

नवीन Nokia G42 5G 90Hz रिफ्रेश रेट आणि HD+ गुणवत्तेसह 6.56-इंचाच्या IPS LCD पॅनेलसह उपलब्ध झालाय. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोन 2GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 20W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. Nokia G42 5G Android 14 वर चालतो. हा फोन Android 15 वर देखील अपग्रेड होईल, असं कंपनीकडून दावा केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nokia G42 मध्ये 50 MP प्राइमरी कॅमेरा आहे. तसेच 2MP मॅक्रो लेन्स आणि 2 MP सखोल सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय. यात मायक्रोएसडी सपोर्ट, फेस अनलॉक, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील आहे.

Nokia G42 5G ची किंमत

हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनपैकी एक आहे. 4GB RAM सह येणारा Nokia G42 5G च्या मोबाईलची किंमत 9,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ८ मार्चपासून अॅमेझॉनवर खरेदी करू शकतील. हा स्मार्टफोन 8GB + 128GB व्हेरिएंटमध्ये देखील येतो ज्याची किंमत 12,599 रुपये आहे, तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हे प्रकार गेल्या वर्षीपासून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे याच किमतीमध्ये LAVA Blaze 2 5G फोनही उपलब्ध होत आहे . या मोबाईलमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

Maharashtra News Live Updates: ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडणार; मातोश्रीतील बैठकीत ठाकरे गटाचा निर्धार

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

SCROLL FOR NEXT